पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ई श्रमिक लेबर कार्ड नोंदणी अभियानास सुरुवात

0

 चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव लोकसभा मतदार संघातील खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या चाळीसगाव येथील कार्यालयात सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७१ वा वाढदिवस आहे, हा  वाढदिवस सेवा संवर्धन पंधरवाडा म्हणून मतदारसंघात राबविण्यात येणार असून या सेवा संवर्धन पंधरवड्यात ई श्रमिक लेबर कार्ड नोंदणी अभियान ही असंघटित कामगारांसाठी केंद्राची महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातून ७१वा वाढदिवस निमित्ताने  ७१ हजार ई श्रमिक लेबर कार्ड नोंदणी करण्याचा मनसुबा आहे.

या अंतर्गत नोंदणी करणाऱ्या असंघटित कामगार दोन लाखाचा एका वर्षासाठी विमा मोफत मिळणार आहे या योजनेची सुरुवात २६ ऑगस्ट २०२१ पासून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड योजना सुरू केली आहे.  या योजनेअंतर्गत असंघटित कामगारांना सामाजिक व कल्याणकारी योजना योजनांचा लाभ मिळेल.  सहकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्ती चा मागोवा घेऊन त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल, सरकारला असंघटित कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांना होईल, हे कार्ड तयार केल्यास असंघटित कामगारांना सरकार कडून एक वर्षासाठी विमा मोफत दिला जाईल, तसेच असंघटित कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार यांचा विचारधिन  आहे.

लहान व सीमांत शेतकरी, शेतमजुर, सुतार, कुंभार, पशुपालक, आशा कामगार, अंगणवाडी सेविका ,रस्त्यावरचे हात मजूर ,बांधकाम कामगार, दूध उत्पादक शेतकरी, न्हावी, भाजी व फळ विक्रेते, ऑटो रिक्षा चालक, गवंडी, लोहार, सुरक्षा कर्मी ,प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मच्छिमार कामगार ,व पुडी भरणारे कामगार, चामडे शिवणारे व विकणारे कामगार, मीठ बनवणारे व विकणारे कामगार ,वीट भट्टी व खोदकाम करणारे कामगार ,घर काम करणाऱ्या महिला ,वृत्तपत्रे विकणारे कामगार, रेशीम कपडे शिवणारे कामगार, घरात कामाला असणारी महिला व पुरुष कामगार, दूध विक्री करणारे कामगार, प्रवासात काम करणारे कामगार ,असे इतर श्रमिक कामगार लेबर कार्ड काढू शकतात या नोंदणीसाठी आधार कार्ड सक्रिय बँक खाते पासबुक सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असलेला महत्त्वाचा आहे.

या अभियानात श्रमिक लेबर कार्ड योजनेची अधिक माहिती किंवा लेबर कार्ड बनवण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील ३४५ बूथ केंद्र बनविण्यात आले असून या नोंदणी सहकार्य करण्यासाठी  ३४७५ कार्यकर्त्यांची टीम बनविण्यात आली आहे.  या अभियानासाठी केंद्र सरकारने चाळीसगाव तालुक्यात दिलेल्या ३५६ सीएससी केंद्राचा उपयोग करून घेण्यात येणार आहे या श्रमिक लेबर कार्ड मिळवण्यासाठी ची वयोमर्यादा १८ ते ५९ वर्ष अशी असणार आहे. तरी या महत्त्वाकांक्षी अभियाना अंतर्गत जास्तीत जास्त असंघटित व श्रमिक कामगारांनी नोंदणी करून या जॉब कार्डाचा व विमा कवचा फायदा करून घ्यावा असे आवाहन खासदार उन्मेश पाटील यांनी केले आहे.

या अभियानाचा सुरुवात एकाच पंधरवड्यात जळगाव ,अमळनेर, धरणगाव ,पारोळा, एरंडोल ,पाचोरा ,भडगाव, चाळीसगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी  अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद गटनेते पोपट भोळे, भाजपा तालुका अध्यक्ष सुनील निकम, माजी अध्यक्ष के बी साळुंके, चाळीसगाव पंचायत समिती उपसभापती भाऊसाहेब पाटील, दिनेश बोरसे, प्रशांत पालवे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.