ना. गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटलांनी घेतली खडसेंची सदिच्छा भेट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज मुंबईत राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व आमदार चिमणराव पाटील यांनी मा.महसुलमंत्री एकनाथरावजी खडसे  सदिच्छा भेट घेतली.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रकृती बिघडल्याने ते बॉंबे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. त्यांना अलीकडेच डिस्चार्ज मिळाला आहे. कालच माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी नाथाभाऊंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. याप्रसंगी जिल्हा बँक निवडणुकीबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान,  आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी नाथाभाऊंची भेट घेतली. यात त्यांनी प्रकृतीची चौकशी करून त्यांना लवकरच स्वास्थ लाभो ही सदिच्छा व्यक्त केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.