खंडेरावनगरातील पुलाजवळ आढळला मुलीचा मृतदेह

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील हरीविठ्ठलनगरात एक  मुलगी नाल्यात वाहून गेल्याची घटना आज  दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. तिचा मृतदेह खंडेराव नगरातील पुलाजवळ आढळून आला आहे.

शहरातील वाघनगरातून आलेल्या नाल्यातून एका १५ ते १८ वर्षीय अनोळखी मुलगी वाहून गेल्याची घटना आज दुपारी १ वाजता घडली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह खंडेराव नगरात  आढळून आला  आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी तिचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला . बऱ्याच वेळेनंतर या मुलीची ओळख पटली असून  गायत्री सुरेश मिस्तरी ( वय १४ , रा. पाण्याची टाकी जवळ,  हरिविठ्ठल नगर जळगाव ) असे तिचे नाव आहे.  याप्रकरणी  पोलीस चौकशी करीत आहेत.

गायत्री मिस्तरी ही अल्पवयीन मुलगी वडील सुरेश शामराव मिस्तरी आणि आई सिमाबाई मिस्तरी यांच्यासह लहान बहिण सोनू सोबत राहते. आज बुधवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी वडील सुरेश मिस्तरी हे अयोध्या नगरात कामावर निघून गेले. आई सिमाबाई घरात होत्या. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गायत्री कोणालीही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या. आरएमएस कॉलनीजवळ रामानंदनगरातून येणाऱ्या रस्त्यावरील लागणाऱ्या नाल्याजवळ गायत्री उभी होती. पाय घसरल्याने ती वाहत्या नाल्याच्या पाण्यात पडली.

हा प्रकार काही तरूणांच्या लक्षात आला. पण काही करण्याच्या आता गायत्री पाण्यात बेपत्ता झाली. याबाबत रामानंदनगर पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधाशोध करत असतांना दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास त्या मुलीचा मृतदेह खंडेराव नगरातील नाल्याजवळ आढळून आला. सुरूवातील अनोळखी म्हणून पोलीसांनी मृतदेह  जिल्हा रूग्णालयात रवाना केला. गायत्रीच्या गल्लीतील काही तरूणांना लक्षात आली. गायत्रीचे वडील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली व ओळख पटली. गायत्रीच्या पश्चात आई वडील, मनिषा, माधुरी, सरला, दुर्गा आणि सोनू अश्या पाच बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.