नवी दिल्ली येथील सीबीआयच्या मुख्यालयाला अचानक लागली आग

0

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 

आज सकाळी राजधानी नवी दिल्लीतील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या मुख्यालयाला  आग लागली. अचानक आग लागल्याने सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर आले आहेत. इमारतीमध्ये धुराचे लोट असून अग्निशामन दल पोहोचले आहे. फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

सीबीआयचे हे कार्यालय दिल्लीच्या लोधी रोडवर आहे. आग कशी लागली, कोणत्या फ्लोअरवर लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सीबीआयच्या या मुख्यालयामध्ये महत्वाचे अनेक कागदपत्र असतात. यामुळे या आगीतून काय नुकसान झाले, त्याच्या मागचे कारण काय आदी गोष्टी देखील समोर येणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.