भरधाव चारचाकी वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात; दोघांचा मृत्यू

0

जळगाव, प्रतिनिधी 

नशिराबाद जवळ  भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात  कारमधील दोन तरूणांचा जागी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ३ वाजेच्या सुमारास  घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

या अपघातात  अभिजित सुभाष पसारे (वय ३० रा. डोंबीवली ता.जि. ठाणे) आणि पवन नंदू बागुल (वय २७ रा. मानपाडा. ठाणे) असे मयत झालेल्या दोन्ही तरूणांची नावे आहे.  अभिजित पसारे हा तरूण ठाणे येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. पवन बागुल हे देखील नोकरीला आहे. आणि अभिजित यांचा मित्र आहे. अभिजित पसारे यांचा  साखरपुडा भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे झाला होता. अभिजित यांचे होणारे हे सासरे हे आजारी  असल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांना पाहण्यासाठी भावी पत्नी व सासू हे मुंबईला बघण्यासाठी आलेल्या होत्या.

दरम्यान अभिजित पसारे यांनी भावी पत्नी व सासूला सोडण्यासाठी भाड्याची कार करून ७ जुलै रोजी सायंकाळी साकेगाव येथे सोडण्यासाठी मित्र पवन बागुल सोबत आले होते. दरम्यान, आज सकाळी ३ वाजेच्या सुमारास अभिजित आणि पवन हे दोघे मुंबईकडे जाण्यासाठी निघाले. सकाळी नशिराबाद गावाजवळ ३ वाजेच्या सुमारास फोरवे ने जात असतांना सरस्वती फोर्डजवळ अचानक सिंगल रस्ता लागल्याने भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या बाजूला आदळली. त्यात कारने १०० मीटरपर्यंत उलट्या घेतल्या. यात अभिजित पसारे हा तरूण जागीच ठार झाला तर पवन बागुल गंभीर जखमी झाला होता. जखमी पवनला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान पवनचाही मृत्यू झाला.  मयत पवन बागुलच्या पश्चात आई मनिषा, पत्नी जयश्री असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.