मुस्लिम बांधवांनी मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड लिहून राबवली मोहीम

0

कासोदा ता. एरंडोल,  प्रतिनिधी 

एरंडोलचे नगरसेवक अस्लम पिंजारी, एरंडोल शहर व तालुका, कासोदा, एरंडोल तालुक्यातील समस्या, आरक्षण आणि मुस्लिम समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारला जागृत करण्यासाठी सरकारची मनधरणी करण्यासाठी, कमिशन कमिटीने दिलेल्या दुर्दशावर दिलेल्या अहवालावर मुस्लिम बांधवांनी पोस्टकार्ड लिहिण्याची मोहीम सुरू केली आहे.

हे पाहताच महाराष्ट्रातील मुस्लिम जागृत होतील आणि पोस्ट कार्डांद्वारे किंवा  इतर मार्गाने लढा देतील.  या कार्डच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आपले लक्ष मुसलमानांच्या समस्यावर द्यावे,  या उद्देशाने   मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्डद्वारे  मागण्या लिहून मंत्रालय मुंबई येथे पोस्ट करण्यात आले. यावेळी एरंडोल येथील नगरसेवक अस्लम पिंजारी शाकिर सर, अरशद अली ग्रामपंचायत सदस्य, मुदस्सर शेख ऊर्फ (अबू) ग्रामपंचायत सदस्य शेख रहीम,  मुजाहिद गाझी, समीर मुल्लाजी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.