धक्कादायक.. पतीने बेशुद्ध पत्नीच्या तोंडात LPG गॅसचा पाईप कोंबून केली हत्या

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून पतीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात शाहनावाज सैफी आणि सदफ सैफी हे जोडपं राहात होतं. या दोघांना एक २ वर्षाची मुलगी होती. मात्र या जोडप्यात सतत भांडणं होतं होती. सततच्या भांडणाला कंटाळून पतीने आपल्या पत्नीला बेशुद्ध केल. त्यानंतर तिच्या तोडांत घरातीव गॅसची पाईपलाईन घातली. यातच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान पत्नी मरण पावल्यानंतर पतीने तिच्या शरिराचा काही भाग जाळण्याचा प्रयत्न केला. पत्नीची हत्या केल्यानंतर पती आपल्या आपल्या मुलीसोबत पळून जात होता. मात्र पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातून अटक केली.

शाहनवाज आणि सदफ यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडत होते. या भांडणाला कंटाळून पतीने आपल्या पत्नीला बेशुद्ध होण्याचे औषध दिलं. त्यानंतर गॅसच्या मदतीने तिचा खून केला. तसेच घराला कुलूप लावून तो फरार झाला.  पोलिसांनी शाहनवाजच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. मध्य प्रदेशातील इटारसी स्टेशनवर त्याला अटक करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.