धक्कादायक : तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन पाळधीचे दलित मित्र डॉ.व्ही .आर .पाटील यांची आत्महत्या

0

चोपडा अमळनेर रस्त्यावरील निमगव्हाण जवळील तापी नदीच्या पुलावरील घटना

चोपडा/पाळधी ता.धरणगाव ;- चोपडा तालुक्यात असलेल्या निमगव्हाण येथील तापी नदीच्या पुलावरून पाळधीच्या डॉक्टरांनी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या कोणत्या कारणाने केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मयत डॉक्टरांची कार पुलावर आढळून आली. दरम्यान त्यांच्या कारमध्ये एक कागद लिहिलेला आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कागदावर नेमके काय लिहिले आहे हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान डॉक्टर पाटील यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू असल्याचे कळते.

दलितमित्र डॉ.व्ही .आर .पाटील वय 75 रा.पाळधी ता.धरणगाव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

पाळधी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून व्ही .आर .पाटील ओळखले जातात. ते मराठा समाजाचे असून त्यांनी श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली होती, तसेच संत तुकाराम महाराज पंच मंडळाचेही ते अध्यक्ष होते. पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून यात त्यांचा दलितमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.

 

पाळधी ता.धरणगावयेथील डॉ, व्ही. आर. पाटील (८०) यांनी चोपडा तालुक्यातील निमगव्हाणजवळ असणाऱ्या तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली . आपली चारचाकी गाडी पुलावर लावून त्यांनी पुलावरून थेट नदीत उडी घेतली. यामुळे पाळधी गावासह धरणगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली. आज दुपारी अमळनेर तालुक्यात त्यांचा मृतदेह वाहून आला. काही भिल समाजाच्या तरुणांना तो दिसून आला. घटनेची माहिती कळताच अमळनेर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला.

सुसाईड नोटमध्ये काय लिहलंय
डॉ. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली आहे. त्यात आपण स्वातंत्र्य दिनासारखा चांगला दिवस मृत्यूसाठी मुद्दामहून निवडत असल्याचे म्हटले आहे. जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली. त्यामुळे आता जीवन चांगल्या प्रकारे जगल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.
पुरोगामी चळवळीत सक्रीय असलेल्या डॉ. पाटील यांना शासनाचा दलित मित्र पुरस्कार मिळाला .

रात्री उशिरा होणार अंत्यसंस्कार

डॉ. व्ही. आर पाटील यांचा मृतदेह अमळनेर तालुक्यात तापी नदीत आढळून आल्याने त्यांच्यावर रात्री पाळधी गावी ९ :३० वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा राकेश, सून, नातवंडे असा परिवार आहे. पाळधी येथील मेन रोडवर कस्तुरबा नावाचे हॉस्पिटल आहे. दरम्यान त्यांच्या निधनाची वार्ता कळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाळ सोनवणे समता परिषदेचे भूषण महाजन शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानाजवळ मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.