दाताळा जवळ दुधाचा ट्रक आणि नारळाचा ट्रकमध्ये भीषण टक्कर: 2 जणांचा मृत्यू

चालक जागीच ठार तर, क्लिअनर जखमी बुलढाणा येथे उपचार सुरु

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

बुलढाणा रोडवर दाताळा येथील अमित पेपर मिल नजीक दुधाचा ट्रक नं MH04 GB 9542 आणि नारळाचा ट्रक नं.RJ17 GA 5292 यांच्यात भीषण टक्कर होऊन मोठा अपघात झाल्याची घटना रात्री 8;15 वाजेदरम्यान घडली. या अपघातात दोन्ही वाहनातील चालक दगावले आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकने अचानक पेट घेतला. आगीत होरपळून आयशर ट्रक चा चालकाचा जागेवर मृत्यू झाल्याचे समजते. रात्री 8:15 वाजे दरम्यान झालेल्या या अपघातामुळे मलकापूर आणि बुलढाणा मार्गावरची ट्रॅफिक जाम झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच दाताळा येथील पत्रकार विलास खर्चे, अमोल दंडे, रमेश मोरे, अनिल दंडे, बिल्लू राजपूत, नारायण नेमाडे सह आदींनी घटनास्थळी धाव घेतली, अपघाताची माहिती लोकनेते ॲड हरीश रावळ यांना मिळताच त्यांनी मलकापूर नगर परिषदेचे अग्निशमन, ॲम्ब्युलन्स यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली, दुधाचा आयशर ट्रक हा अमर डेअरीचा असुन तो मोताळ्याकडे जात होता, तर ओल्या नारळाचा ट्रक बुलढाणा कडून मलकापुरकडे येत होता. सदर ट्रक राजस्थान पासिंग आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.