डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहे. २०२० साली निवडणूक निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता याप्रकरणी जॉर्जियातील एका न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. जॉर्जियातील फिल्टन काऊंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्या १८ साथीदारांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं. यासाठी त्यांना डेडलाईन देण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्यावर १३ आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ग्रँड ज्युरी यांनी १३ गंभीर आरोप लावले आहे. या आरोपांमध्ये RICO, खोटी कागदपत्र दाखल करणे, सार्वजनिक अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेचं उलंघन करणं आणि इतर आरोपांचा समावेश आहे. “ट्रम्प यांच्यासह इतर सहकाऱ्यांवर असे आरोप आहेत, की त्यांनी ट्रम्प यांचा पराभव मान्य केला नव्हता. यामुळे जाणून बुजून, बेकायदेशीरपणे निकालांचे पराभव ट्रम्प यांच्या बाजूने बदलण्याच्या कटामध्ये हे सर्व सहभागी झाले होते”, असं फॅनी यांनी आपल्या आरोप पत्रात म्हंटले आहे. त्या पुढे म्हणाल्या, “२० जानेवारी २०२१ पासूनच डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष करण्याची योजना जॉर्जिया आणि इतर ठिकाणी मतांची मोजणी रोखण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले होते.

कोण आहेत सहभागी?
ट्रम्प यांच्यासह या आरोपांमध्ये व्हाईट हाऊसचे माजी चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोज, न्यूयॉर्कचे माजी मेयर रुडी गिउलियानी आणि ट्रम्प सरकारमधील न्याय विभागाचे अधिकारी जेफ्री क्लार्क यांचा समावेश आहे. या सर्वांना आत्मसमर्पण करण्यासाठी पुढील शुक्रवारपर्यंत वेळ देण्यात आली आहे. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२वाजेपर्यंतची मुदत या सर्वांना देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.