धक्कादायक.. आरपीआय महिला पदाधिकारीची हत्या; चाकूने 20 ते 25 वार

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिकमध्ये  भीषण हत्याकांड घडलं आहे. ऐन दिवाळीत एका महिलेची चाकूने वार  करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मृत महिलेचं नाव पूजा आंबेकर  असून ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली आहे. 20 ते 25 वार करुन निर्घृण हत्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा आंबेकर या आरपीआयच्या पदाधिकारी होत्या.

रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली की, आरोपीने पूजा आंबेकर यांच्यावर चाकूने तब्बल 20 ते 25 वार केले. सोबत राहणाऱ्या इसमानेच हत्या केली असल्याचा संशय आहे. संबंधित संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे.

त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गंगापूर पोलीस या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.