पालकमंत्र्यांची फटकेबाजी

0

जळगाव जिल्हा भाजपच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा काढला. जनआक्रोश मोर्चाचे यशापयश राहिले बाजूला पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच खा.उन्मेश पाटील आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यात आरोप – प्रत्यारोपाच्या फैरीचे कवित्व सुरु झाले. भाजपच्या जनआक्रोश मोर्चाच्या समारोप सभेत गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तर याच सभेत खा.उन्मेश पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेवर सडकून टीका केली. खा.उन्मेश पाटील यांनी पालकमंत्र्यांवर हे तर बालकमंत्री आहेत. खा.उन्मेश पाटलांच्या या वक्तव्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील गप्प बसतील कसे? काल मंगळवारी पाचोरा येथे आ.किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात खा.उन्मेश पाटलांना उद्देशून गुलाबराव पाटील म्हणाले तुझा बाप गुलाबराव पाटील होता. म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तू भरघोस मतांनी निवडून आला. एवढ्या लवकर विसरला होय. पाचोरा मतदार संघात आ.किशोर आप्पा पाटलांची समजूत घातली. म्हणून तुला मते मिळाली हे विसरला वाटतं. इतक्या लवकर गद्दार झाला. म्हणून उन्मेश पाटलांवर सडकून टीका केली. खा.उन्मेश पाटलांवरील जाहीर भाषणातील गुलाबराव पाटलांच्या भाषणाला सभेत जोरदार प्रतिसाद मिळत होता. गेल्या दोन वर्षात खा.उन्मेश पाटलांनी साधी मुतारी बांधली नसल्याचा आरोप केला.

गुलाबराव पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत. खा.उन्मेश पाटलांच्या निवडणूक प्रचारार्थ अमळनेर येथे आयोजित सभेत व्यासपिठावर भाजप नेते आणि कार्यकर्त्यात झालेल्या हाणामारीच्या प्रकाराला हा गुलाबराव होता. म्हणून प्रकरण चिघळले नाही अन्यथा काय झाले असते हे सांगण्याची गरज नाही. खा.उन्मेश पाटील एवढ्या लवकर विसरले का? असा सवालही गुलाबराव पाटलांनी केला. गुलाबराव एवढ्यावरच थांबले नाहीत माझ्या नादी लागू नका असा सज्जड दमही दिला. त्यामुळे भाजपच्या जनआक्रोश मोर्चा राहिला बाजूला भाजप विरुध्द शिवसेना असा सामना रंगत असतांना दिसतोय. नारायणण राणेसारख्यांना हा गुलाबरावांनी धडा दिलाय. हे ही खा.उन्मेश पाटलांवर तोफ डागतांना संताप व्यक्त केला असून तरी खा.उन्मेश पाटलांची प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांवर व्यक्तीगत टीका करून हवेत तीर मारण्याचा आरोप करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाजप व शिवसेना यांचे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताहेत एकीकडे दिवाळी फटाके फुटतायत तर दुसरीकडे राजकीय नेत्यांची शाब्दीक फटाके फुटत आहेत.

भाजप नेते गिरीश महाजन यांचे नेतृत्वात हा आक्रोश मोर्चा निघाला होता. गिरीश महाजनांनी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडाल्याची टीका मोर्चाला संबोधित करतांना केले. त्यावर पलटवार करतांना गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांची ही नौटंकी असल्याचा आरोप करून जलसंपदा मंत्री असतांना 5 वर्षाच्या कालावधीत अप्पर तापी प्रकल्पासाठी एकही दमडी आणू शकले नाहीत. तसेच गेल्या अनेक महिन्यापासून राजधानी दिल्ली शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करताय. शेकडो शेतकऱ्यांचे या आंदोलनाला स्वतः प्राण गमावले आहे. तरीसुध्दा भाजप सरकारला पाझर फुटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जळगावात मोर्चा काढणे म्हणजे शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम असल्याची घणाघाती टीका गुलाबरांवानी केली. त्याचबरोबर शेतकरी आणि जनतेच्या ज्या मुख्य समस्या जीवनावश्यक वस्तूंची महागाई याविषयी गिरीश महाजन एक शब्द बोलत नाही. पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे दर आकाशाला भिडले आहेत. सर्व सामान्य जनता आणि नागरिक त्रस्त झाली आहे. त्याविषयी भाजपवाले काही बोलत नाही असाही आरोप गुलाबरावांनी केला. एकदंरित विरोधी पक्ष भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप कलगीतुरा जोरात चालत आहे.

जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना शासनतर्फे नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. सत्ताधारी म्हणतात शासनाकडून मदत आलेली आहे त्याचे वाटपही सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वादात शेतकऱ्यांची गोची होवू नये एवढीच अपेक्षा. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती तर आकाशाला भिडल्या आहेत. दिवाळीसणामध्ये गृहिणींचे अर्थकारण बिघडले आहे. दिवाळींच्यासणांवर महागाईचे सावट पसरले आहे. सर्वसामान्याची दिवाळी अंधारात जातेय. राजकीय नेत्यांची आरोप प्रत्यारोपाच्या फटकेबाजीची दिवाळी साजरी होतेय पण सर्वसामान्यांना त्यांचे काही सोयरसुतक नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.