तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील सिध्दार्थ नगरात तरूणाला काहीही कारण नसतांना तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखन समाधान सपकाळे (वय २७, रा. सिध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी) हा तरूण आपल्या कुटुंबियासह राहतो. कुरीयर व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी २३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लखन सपकाळे हा सिध्दार्थ नगरातील बांधावर बसलेला असतांना तेथे मंगल सुतार (पुर्ण नाव माहित नाही) आणि अनोळखी दोन जणांनी काहीही कारण नसतांना लखन याला शिवीगाळ करून मारहाण केली.

मंगल सुतारने हातात काठी घेवून लखनच्या डोक्यात मारली. तर इतर दोघांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. प्रथमोपचार करून लखन सपकाळे यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.