ठेकेदारावर कारवाई टाळण्यासाठी अळीमिळी गुपचिळी! भाग-१४

0

शेवयांचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : चौकशीच्या नावाखाली चालढकल

जळगाव, दि. 23 –
अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आलेल्या बुरशीयुक्त शेवयांच्या मक्तेदाराला वाचविण्यासाठी अधिकार्‍यांनी मिलीभगत केली असून कारवाई टाळण्यासाठी सार्‍यांनी अळीमिळी गुपचिळी असे धोरण अवलंबले आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु असून चौकशीच्या नावाखाली चालढकल सुरु आहे.

समितीला जबाबदारीची जाणीव नाही
आहार पुरवठा व देखभाल समितीने या प्रकरणाची दखल घेतलेली नसून या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी हे असूनही ठोस कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. समितीला जबाबदारीची जाणीवच नसल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीवरुन सिद्ध होत आहे.
गेल्या महिन्यात पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडी बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा होत असल्यचे समोर आल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश देत तत्परता दाखविली मात्र ठेकेदारा हा सत्ताधारी भाजपा पदाधिकारी असल्याचे लक्षात आल्यानंतर सार्‍यांनीच या प्रकरणी अळीमिळी गुपचिळी असे धोरण स्विकारले असून कावाईसाठी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश केले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी चौकशीचा सोपस्कार पूर्ण करण्याचा श्रीगणेशा केला मात्र ही केवळ चालढकल ठरली आहे. धुळे येथील मक्तेदाराला अंगणवाड्यांना शेवया पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला असून हा मक्तेदार भाजपाचा पदाधिकारी असून त्याला वाचविण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. शिवसेना सदस्या रेखा राजपूत यांनी बुरशीयुक्त शेवयांची पॉकिटे प्रशासनाकडे देवून देखील कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून मुर्हूताचा शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.