महाराष्ट्र राज्य स्विमिंग निवड चाचणीसाठी पाच खेळाडूंची निवड

0

जळगाव;- स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडिया व डेक्कन जिमखाना पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ते २७ मे २०१८ रोजी बालेवाडी क्रीडा संकुल,पुणे येथे महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर स्वीमिंग निवड चाचणी ठेवण्यात आलेली आहे.सदर स्पर्धेकरीता आपल्या जळगाव जिल्हा हौशी जलतरण असोसिएशिनचे खालील जलतरणपटूची निवड झाली आहे.

रोहन विनायक चौधरी(१७ वर्षाखालील मुले)-५० व १०० मी.फ्री स्टाइल.अमेय कमलेश नगरकर (१४ वर्षखालील मुले)-५०मी .फ्री ,स्टाइल, बॅकस्ट्रोक, वॉटर पोलो निवड चाचणी.वर्धन सुदीप जावडेकर-(१४ वर्षाखालील मुले)-५०,१००,२०० मी.फ्री स्टाइल व ५०,१००मी. ब्रेस्ट्रोक भूपती जयंत चौधरी(१२वर्षा खालील मुले)-५०,१००मी.स्टाइल व ५० मी.बटरफ्लायरुजल अनिल शिरसाळे(१२ वर्षाखालील मुली)-५०,१००मी.ब्रे स्ट्रोक व ५० मी बॅक स्ट्रोक वरील सर्व जलतरणपटू निवड चाचणी करीता जळगांव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.टीम मॅनेजर कमलेश नगरकर हे राहतील.सदर खेळाडूंना जळगाव जिल्हा हौशी जलतरण संस्थेच्या अध्यक्षिका सौ.रेवती नगरकर,उपाध्यक्ष राजेंद्र ओक,सचिव फारूक शेख, सहसचिव किशोर नेवे यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.