जीवे ठार मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार

0

जळगाव -जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका ३५ वर्षीय महिलेला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३४ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास असून या महिलेवर २ जुलै ते २५ जुलै या दरम्यान जामनेर शहरातील एका ठिकाणी व मलकापूर शहरात देखील वेळोवेळी ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी महिलेने जामनेर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी इरफान इस्माईल सय्यद (वय २५) रा.बोदवड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे, जामनेर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे हे काम करीत असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.