जामनेर तहसीलवर विविध न्याय्य मागण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा

0

जामनेर दि. 4-
आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी येथील जेष्ठ नागरिकांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.फेस्कॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ जामनेर तालुका यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चाची सुरुवात ज्येष्ठ नागरिक हॉल पासून करण्यात आली होती.ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 ऐवजी 6ज असावे,नियोजित धोरणा करता लागणार्‍या खर्चाची तरतुद येणार्‍या आर्थिक बजेटमध्ये असावी.श्रावणबाळ वार्धक्य निवृती वेतनात वाढ करावी.ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामुल्य आरोग्य विमा योजना सुरु करावी.तसेच स्वतंत्र विभाग,आयुक्तालय, स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक करावी.6ज वर्षाच्या वरील शेतकरी व शेतमजुरांना शासनाने निवृत्ती वेतन द्यावे.महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रतिनिधी मंडळास मुख्यमंत्री यांनी चर्चे करीता वेळ देवून बोलवावे,तसेच महात्मा फुले जिवनदायी योजनेत ज्येष्ठ नागरिकांना सामाविष्ठ करावे.अश्या विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आलेल्या आहेत. यावेळी तहसीलदारांच्या वतीने नायब तहसिलदार दिनकर पाटील यांनी निवेदन स्विकारले.निवेदन देते वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष नारायण महाजन,उपाध्यक्ष डॉ.रामदास पाटील,सचिव रंगनाथ पाटील,पाडुरंग माळी,रसालसिंग पवार,नारायण वाघ ,भागवत पाटील,अवधूत सोनवणे,आनंतराव पाटील, प्रभाकर सोनार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.