जळगाव जिल्हा जागृत मंचतर्फे अण्णा हजारेंना महात्मा उपाधी प्रदान

0

जळगाव दि. 4-
जळगाव जिल्हा जागृत मंचतर्फे अण्णा हजारे यांना त्याच्या गावी राळेगणसिद्धी, अहमदनगर येथे जावून महात्मा ही उपाधी नुकतीच बहाल करण्यात आली.
यावेळी जळगाव जिल्हा जागृत मंचचे शिवराम पाटील, कॉ. अनिल नाटेकर ईश्वर मोरे आदी उपस्थित होते. अण्णा हजारे यांना सन्मानित करताना सन्मानीय अण्णासाहेब किसन बाबुराव हजारे, राळेगणसिद्धी यांना त्यांच्या निष्काम व महान कार्याबद्दल त्यांना महात्मा ही उपाधी देवून प्रेम व्यक्त करीत आहोत. गौरव करीत आहोत ऋण व्यक्त करीत आहोत. भारतातील राजकीय सत्ता, प्रशासकीय कार्य, सुरक्षा व्यवस्था, न्यायदान यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे.
महाभारतातील धृतराष्ट्रकालीन हस्तिनापूरसारखी परिस्थिती सांप्रत भारताची बनलेली आहे. राष्ट्रीय पक्ष किंवा अन्य प्रादेशिक पक्ष या राजकीय टोळ्या बनून सेवेचे धोरण सांगून जनतेच्या हक्काचे धन लुटत आहेत. अशा अपहारावर व अपहारकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार, नागरिकांची सनद, ग्रामसभा आणि आता लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीसाठी लढत आहेत. निवडलेला उमेदवार नाकारणे हे महान तत्व अण्णांच्या महान विचारांची देण आहे.
असा हा महान विचारांचा पुरुष, माननीय किसन बाबुराव हजारे राळेगणसिद्धी हे महात्मा आहेत. असे आम्ही अनुभवाने, सद्सद्विवेकबुद्धीने मान्य करतो, म्हणून अण्णांना आम्ही प्रेमाने आत्मियतेने महात्मा संबोधन करीत आहोत, असे त्यांना प्रदान केलेल्या मानपत्रात नमुद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.