सीएम चषक स्पर्धेत मुक्ताईनगर विधानसभा उत्तर महाराष्ट्रात प्रथम

0

मुक्ताईनगर दि. 4-
ग्रामीण शहरी भागातील युवक युवती यांच्या मधील कला गुणांना वाव मिळावा त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी संपुर्ण राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सिएम चषकाचे विधानसभा ,जिल्हा ,राज्य स्तरावर आयोजन करण्यात आले होते.
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात सि एम चषक अंतर्गत आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा, उडान 100 मि धावने ,मुद्रा योजना 400 मि धावने, शेतकरी सन्मान कबड्डी योजना ,इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा , मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा , खो खो स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते
यामध्ये पुर्ण विधानसभा क्षेत्रातून सुमारे 65885 स्पर्धकांनी सहभाग घेतला
स्पर्धेत विजयी संघ , स्पर्धक यांना बक्षिस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे ,खा रक्षाताई खडसे यांच्या सही असलेले प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातून सहभागी स्पर्धकांची
65885 हि संख्या संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा क्षेत्रातून उच्चांकी ठरली आहे
त्याबद्दल मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय अंतिम बक्षिस वितरण सोहळ्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे सि एम चषक अभियान संयोजक संदिप देशमुख यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे , भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा खा पुनमताई महाजन , मुंबई भाजपा अध्यक्ष आ आशिष शेलार , युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर , खा रक्षाताई खडसे , आ संतोष दानवे ,आ उन्मेश पाटील , युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील, वार रूम प्रतिनिधी प्रफुल्ल जवरे विनोद चौधरी उपस्थित होते.
सि एम चषकच्या या यशस्वी आयोजनाबद्दल अभियान संयोजक संदिप देशमुख, सर्व स्पर्धांचे संयोजक, युवा मोर्चा पदाधिकारी यांचा माजी मंत्री आ एकनाथराव खडसे , खा रक्षाताई खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा ड रोहिणीताई खडसे खेवलकर, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान संयोजक डॉ राजेंद्र फडके, जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि प अध्यक्ष अशोक कांडेलकर, बाजार समिति सभापती निवृत्ती पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, कैलास चौधरी, चिटणीस राजू माळी,भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले ,सह क्षेत्र प्रमुख शिवाजी पाटील, तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर,भागवत टिकारे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.