जाणून घ्या.. जळगावातील आजचे सोने- चांदीचे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मागील काही दिवसांमध्ये मोठ्या घसरणीनंतर आज सोने आणि चांदीची किंमत स्थिर आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा भाव थोडा जास्त 46,980 रू. प्रति 10 ग्रॅम होता तर चांदी वायदा घसरून  64,658.00 रू. प्रति किलोग्रॅम झाला. तर मागील दिवसांमधील कमजोर जागतिक संकेत पाहता, सोने आणि चांदीत जवळपास 1% घसरण झाली होती. अमेरिकन डॉलरमध्ये मजबूती आणि अमेरिकन बाँड उत्पन्नातील तेजीचा परिणाम सोन्यावर झाला.

जागतिक बाजारात सोने 1,800 डॉलर प्रति औंसच्या महत्वपूर्ण स्तराच्या खाली होते, कारण मजबूत अमेरिकन डॉलर आणि उच्च बाँड उत्पन्नामुळे किमती धातूचे सेफ-हेवन अपील प्रभावित झाले. अमेरिकन डॉलर निर्देशांक एक आठवड्याचा उच्च स्तर 92.543 वर पोहचला. मागील सत्रात 1,791.90 पर्यंत घसरल्यानंतर आज  सोने 1,796.03 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहीले.

आजच्या सोने- चांदीच्या दराविषयी जळगाव येथील सराफ व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर 47200 रुपये आहे,  तर आज चांदीचे दर  67000 रुपये आहेत.

तसेच मुंबईत आज सोन्याचा दर 22 कॅरेटचा 46,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.  दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 46,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. बेंगळुरुमध्ये 22 कॅरेटच्या सोन्याचा दर 44,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.