मन्याड धरण पूर्ण क्षमतेने भरले; काठावरील गावांना धोक्याचा इशारा

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मन्याड धरणाच्या समादेश क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जवळपास एक लाख क्यूसेक्स पाण्याचा प्रवाह रात्री दोन ते अडीच वाजता मन्याड धरणातून पास होत आहे.  या कारणाने गिरणा नदीत पूर परिस्थिती निर्माण होणार आहे.  चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण पूर्ण क्षमतेने भरले असून मागील  पंधरवड्यापासून त्यामधून पाणी सोडले जात आहे. काल रात्री मन्याड धरणाच्या वरील बाजूस ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने धरणातून 100000 क्युसेस पेक्षा जास्त पाणी वाहत आहे.  हे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे, या कारणाने गिरणा नदीला मोठा पूर आला आहे.

या कारणाने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव तालुक्यातील नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मन्याड धरण व गिरणा पात्रातील पावसामुळे आलेल्या पुरामुळे जामदा बंधार्‍यावरून जवळपास दीड लाख क्यूसेक्स पाणी पास होणार आहे. बहुळा व हिवरा धरण सुद्धा पूर्ण क्षमतेने भरले असून त्यामधून दहा हजार पेक्षा जास्त पाणी सोडले जात आहे.

गिरणा नदीवर काठावरील सर्व गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.  कोणीही नदी पात्रात जाऊ नये,  गुरेढोरे, चारा, जळतं सामान तसेच शेतीचे अवजारे इत्यादी तसेच नदी काठावरील रहिवास तात्पुरते खळे यामधील सामान सुरक्षित ठिकाणी हलवावे, प्रशासनाने व स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना आपल्या कर्मचाऱ्यांना मार्फत अवगत करून त्या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी होणार नाही, असे कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.