जळगाव जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीचा आ.उन्मेष पाटलांना जाहीर पाठिंबा

0

जळगाव ;- भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी.आय(ए), रासप, शिवसंग्राम, महायुतीचे जळगाव लोकसभेचे अधिकृत उमेदवार आ.उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार राजुमामा भोळे यांच्या पुढाकाराने हॉकर्स बांधवांचा मेळावा दि.१४ एप्रिल रोजी दुपारी १.०० वा. ब्राम्हण सभागृह येथे पार पडला.

सुसंस्कृत, गरिबांची जाणीव असलेला उमेदवार उन्मेष दादा यांना आमचा जाहीर पाठिंबा राहील असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होनाजी चव्हाण यांनी जाहीर सभेत सांगितले. तसेच भाजप सेना महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष दादा पाटील यांना प्रचंड लीड देण्याचा समितीचा निर्धार ही व्यक्त केला. यानंतर आमदार उन्मेष दादा पाटील यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या लोकसभेत मांडून न्याय मिळवून देण्याचा शब्द मेळाव्यात हॉकर्स बांधवांना दिला.

याप्रसंगी जळगाव जिल्हा फेरीवाला हॉकर्स संघर्ष समितीचे महानगरप्रमुख बाळू भाऊ बाविस्कर, दिनेश हिंगणे, प्रभाकर तायडे, सुनील जाधव, गणेश गुप्ता, संजय सोनवणे, राजेंद्र वाणी, रियाज व अहमद, सुनील सोनार, विजय पिंगळे, रवींद्र सैंदाणे, रवींद्र महाजन, हनीफ पिंजारी, फारुख पहिलेकार, विशाल चौधरी, सुरेश चौधरी, गोपाल दायमा,मुसा भाई बागवान,

मोहन तिवारी,नंदू महाजन यांच्यासह हाकर्स जिल्हा संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी पितांबर भावसार, आनंद सपकाळे, प्रवीण गुरव यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.