अमळनेर ग्रामीण भागात आ.उन्मेष पाटलांचा झंझावाती दौरा

0

अमळनेर :- भाजप सेना महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष दादा पाटील यांच्या प्रचारार्थ आज अमळनेर ग्रामीण भागात झंझावती प्रचार दौऱ्याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सडावण, फाफोरे, शिरुड, मंगरूळ, आरडी, आनोरे,, जवखेडा, वावडे, मांडळ, मुडी,  बोदर्डे, बाम्हणे,भिलाली, वासरी , शहापूर कळमसरे, मारवड  गावामध्ये युतीचे उमेदवार आमदार उन्मेश दादा पाटील यांना घरोघरी मतदार बंधू भगिंनिंचे मिळाले आशीर्वाद घेतले.यूतीचे उमेदवारांनी घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. जागोजागी  गावकऱ्यांनी युतीचे उमेदवार उन्मेष दादा पाटील यांना विजयाचे आशीर्वाद दिले . गावाच्या वेशीवर फटाक्याच्या दणदणाटात युतीचे उमेदवार यांचे स्वागत केले जात होते.

आमदार शिरीष दादा चौधरी व आमदार स्मिता ताई वाघ यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने युतीचे उमेदवार लाखोंच्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. या. दोघा दिग्गज आमदारांनी युतीचे उमेदवार आमदार उन्मेश दादा पाटील यांना विजयी करण्याचे  आवाहन केले.

अमळनेर तालुक्यातील  ग्रामीण भागात झंझावती प्रचार दौऱ्याला गावकऱ्यांचा उदंड पाठिंबा लाभला यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

यावेळी अमळनेरचे आमदार शिरीष दादा चौधरी, विधान परिषदेचे आमदार स्मिता वाघ ,आमदार पत्नी तथा अमळनेर माहेरवाशीण संपदा उन्मेषदादा पाटील,जीप सदस्य मीनाताई पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब जीवन पाटील, आप्पासाहेब व्ही. आर. पाटील,प स सदस्य भिकेशदादा पाटील, सरपंच विजय पाटील, महेंद्र पाटील, हरे कृष्ण पाटील ,जिजाबराव पाटील, पांडुरंग पाटील, अमोल पाटील , संदीप पाटील दिलीप पाटील, वाल्मीक पाटील, किशोर पाटील, आनंद पाटील,कैलास खैरनार उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषद सदस्य सोनूताई राजू पवार , विजयाताई पाटील,महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा रामचंद्र परब, शांताबाई पाटील विजयाताई पाटील कमलताई काटकर, विमल ताई पाटील शुभांगी राणे बाळासाहेब पाटील, नंदू अहिरे बाळासाहेब पाटील, नंदू अहिरे, बापू पाटील, मिलिंद पाटील बापु माळी,बापू रवींद्र पिंगळे, विजू मास्टर,बूथ प्रमुख प्रकाश पाटील,सुनील पाटील, भगवान सुतार बाळासाहेब चिंतामण पाटील, भानुदास पाटील, नंदलाल पाटील यांच्यासह विविध  गावातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील दहिवद माहेर असलेल्या आमदार पत्नी संपदा उन्मेष दादा पाटील यांनी घरोघरी जाऊन युतीचे उमेदवार उन्मेष दादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

या परिसरात ठिकठिकाणी जावई उमेदवार उन्मेष दादा पाटील यांचे औक्षण केले जात होते. आमदार उन्मेष दादा व संपदा पाटील यांचे मोठ्या उत्सुकतेने गावकऱ्यांकडून आस्थेवाईक पाणे विचार पुस करण्यात येत होती. सायंकाळी सहा वाजता आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य रॅली काढण्यात आली यावेळी उन्मेष दादा पाटील यांनी व्यापारी, व्यावसायिक नागरीकांचे आशीर्वाद घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.