जळगावात तरुणाने घेतला गळफास !

0

जळगाव ;- तरूणाने आईला फोन करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकेतन समाधान पाटील वय-३३ रा. साईकृपा अपार्टमेंट, खोटे नगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे निकेतन पाटील हा आईसोबत वास्तव्याला होता. गुरूवारी १८ जानेवारी रोजी निकेतनची आई ही मजूरीसाठी गावात कामाला गेलेल्या होत्या. त्यामुळे निकेतन हा घरी एकटाच होता. त्याने दुपारी आईला फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या घराच्या परिसरात त्याची आत्या राहते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आत्याने घरी धाव घेतली.

तोपर्यंत निकेतनने आपली जीवनयात्रा संपविली होती. सायंकाळी ७ वाजता निकेतनची आई घरी आल्यानंतर त्यांनी मनहेलवनारा आक्रोश केला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. तालुका पोलीसांना घटनेची माहिती कळविल्यानंतर मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई आणि लहानभाऊ रितेश असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहे.
================
धरणगाव ,पारोळा तालुक्यातील प्रौढांचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू
जळगाव ;- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका ५० वर्षीय आणि पारोळा तालुक्यातील ५८ वर्षीय प्रौढांनी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून याप्रर्कनी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , सतखेडा ता. धरणगाव येथील लाक्षामं उर्फ रामसिंग बारेला वय ५० यांनी १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता विषारी पदार्थ सेवन केल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता १४ जानेवारी रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी धरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या घटनेत म्हसवे ता. पारोळा येथी अर्जुन सुखदेव पाटील वय ५८ यांनी १८ जानेवारी रोजी काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्याने त्यांचा १८ रोजी सायंकाळी पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला . याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.