जळगावातील तहसील कार्यालयासमोर ‘पाण्याचा डबका’

0

जळगाव | प्रतिनिधी 

येथील तहसील कार्यालयासमोर कित्येक वर्ष झाले, पाऊस पडल्यानंतर भला मोठा पाण्याचा डबका सोचतो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य तसेच   तहसीलच्या मुख्य गेटासमोर पाणी तुडुंब भरलेले  दिसून येते .

आपल्या विविध कामांना घेऊन तालुक्यातून येणाऱ्या  नागरिकांना या घाणीचा  सामना करावा लागत आहे, त्यात रस्ता अरुंद सून  स्थानिक प्रशासन निद्रीय अवस्थेत आहे. की  काय अशी चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये  चालू आहे. तहसील कार्यालयाच्या अगदी गेट समोरील मार्गाची दुरावसत्ता दिसुन येत असुनही क़ाही उपयोग नाहीं. एकिकडे अमृत योजनेमुळे शहरातील बरेच रस्ते खराब झालेले आहे.

त्यातच दुसरीकडे शिवाजीनगर  उड्डाण पुलाचे काम ही  सुरु आहे. त्यामुळे तहसील कार्यालया समोरील रस्ता  हा नागरिकांसाठी उपयोगी ठरतो आहे. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रे हनुमान मंदिर  येथील रस्ता तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले होते. मात्र तो रस्ता काही प्रमाणातच सुरु करण्यात आला आहे. कार्यालया समोर साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव  वाढला आहे. या पाण्यात जंतू सुद्धा निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांचे  आरोग्य लक्षात  घेता स्वच्छता करावी असी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.