जळगावमध्ये रॉयल शोचे भव्य दिव्य ऑडिशन

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रॉयल शोचे भव्य दिव्य असे ‘सौंदर्यवती मी खान्देशची’ आणि ;सम्राट मी खान्देशचा’ ऑडिशन रविवार दि.14 नोव्हेंबरला जळगावमध्ये आयोजित करण्यात आले आहे, असे आयोजक नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मिस्टर. मिस. मिसेस असे या ऑडिशनचे स्वरुप आहे. जळगावमध्ये प्रथमच खान्देशकरांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रॉयल ग्रुपची असल्याची श्रद्धा अडकमोल यांनी सांगितले. खान्देशमध्ये  प्रथमच मराठमोळा लूकचे सादरीकरण केले जाईल. रॉयलने खान्देशमधील महिला आणि युवतींना एक रॉयल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

या शोसाठी सर्व जिल्ह्यामधील युवक आणि युवतींना आवाहन करण्यात येत आहे की, जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी व्हावे, असे इंडिया स्टार गौरव पुरस्कार विजेती आरती बरसे आवाहन केले आहे. ज्यांना या शोमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9766873917 या नंबरवर संपर्क साधावा. रविवार दि.14 नोव्हेंबरला सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत ( ABS FITNESS CLUB )ए. बी. एस. फिटनेस क्लब खान्देश सेंटर जळगाव येथे या शोचे ऑडिशन घेतले जाईल.

या शोचे परिक्षक म्हणून सौंदर्यवती विजेती निशा पवार, मानसी शर्मा, सुजल सोनवणे, अर्चना जाधव काम बघणार आहे. नितीन पाटील, मिसेस इंडिया विजेती रश्मी सागने, युवाक्षी पाटील, आरती बरसे, कांचन पाटील, बट्टू चौधरी, अपूर्वा खरे, रोहन सकपाल, अण्णा सुरवाडे, श्रद्धा अडकमोल, निशा शिंदे उपस्थित राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.