जगातील  एकमेव पांढ-या  गेंड्याचा मृत्यू

0
केनिया ;-
केनियातील ओल पेजेटा अभयारण्यात जगातील एकमेव शेवटच्या पांढ-या नर गेंड्याचा मृत्यू झाला आहे. या गेंड्याचे नाव सुदान असे होते. सुदान ४५ वर्षांचा होता. दोन माद्यांसह त्याला चेक रिपब्लिक येथून २००९ साली ओल पेजेटा अभयारण्यात आणले होते. जगात एकूण चारच पांढरे गेंडे होते. त्यात एकमेव सुदान हा नर गेंडा होता. गेंड्यांच्या संवर्धनासाठी ओल पेजेटा हे अभयारण्य प्रसिद्ध आहे.
सुदानच्या संरक्षणासाठी तसेच त्याला तस्करांपासून वाचवण्यासाठी कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती. सुदानचे वय झाले होते. तसेच त्याच्या पायातली ताकदही हळूहळू कमी होत गेली होती. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला त्रास होत होता. त्याच्यासोबतच्या दोन माद्या सध्या केनियातील अभयारण्यात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.