वैद्य मल्लिकार्जुन वाघण्णा यांचे जीवन म्हणजे एक खुले पुस्तक

0
डॉ. सोमनाथ वडनेरे लिखित पांगुळ्यांचा नाथ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्र.कुलगुरुंचे प्रतिपादन 
जळगाव – (दि.   )
ज्याकाळी पोलिओचे साम्राज्य अवघ्या जगावर होते तेव्हापासून या आजाराविरुध्द लढून वैद्यकिय क्षेत्रात अनेकानेक चमत्कार करुन पोलिओ आणि लकवा झालेल्या रूग्णांना जीवनात खंबीरपणे उभे करण्याची किमया करणारे वैद्य मल्लिकार्जुन वाघण्णा हे ख­या अर्थाने पांगुळ्यांचे नाथ ठरलेत, यांचे जीवन म्हणजे एक खुले पुस्तक आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरु प्रा. पी.पी. माहुलीकर यांनी केले.
निर्मल मीडिया प्रकाशित आणि डॉ. सोमनाथ वडनेरे संपादित पांगुळ्यांचा नाथ, वैद्य  मल्लिकार्जुन वाघण्णा या चरित्र ग्रंथ आणि आरोग्य मार्गदर्शनपर पुस्तकाचा प्रकाशन समारंभात प्रा. पी.पी. माहुलीकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्यांनी आयुर्वेद, होमिओपॅथी सारख्या प्रणालीद्वारे हजारो रुग्णांना नवसंजीवनी दिली अशा वैद्य वाघण्णा यांच्या जीवनचरित्रपर ग्रंथातून एका सरकारी नोकरी सांभाळून वैद्यकिय सेवेची आवड असलेल्या वाघण्णा यांनी आरोग्य सेवेत आपले जीवन कसे समर्पित करुन दिले त्या त्यागाची, संघर्षाची आणि समर्पणवृत्तीची प्रेरणा वाचकांना निश्चित मिळेल.
वैद्य वाघण्णा म्हणजे अध्यात्म आणि आरोग्याचा उत्कृष्ट समन्वय – वैद्य जयंत जहागीरदार
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोलतांना आयुर्वेदाचार्य वैद्य जयंत जहागीरदार म्हणाले की, अध्यात्म, राजयोगाचे नियमित साधक असलेल्या वैद्य वाघण्णां यांच्या हातुन रुग्णांच्या शारिरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचीही सेवा झालेली असल्याने त्यांनी या क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी आहे.  वैद्य वाघण्णा याप्रंसगी डॉ. सूर्यकिरण वाघण्णा यांनी प्रास्ताविकात वैद्य वाघण्णा यांचा जीवनपट उपस्थितांसमोर स्पष्ट केला. ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनीही वैद्य वाघण्णां यांना शुभेच्छा आणि आशीवर्चन दिलेत. मुखपृष्ठकार यशवंत गरुड आणि अक्षरजळुवणीकार सौ. भारती रवींद्र गायकवाड यांचाही सन्मान या प्रसंगी करण्यात आला.
तत्पूर्वी पुस्तक प्रकाशन विद्याीपीठाचे प्र.कुलगुरु प्रा. पी.पी. माहुलीकर, वैद्य जयंत भालचंद्र   जहागीरदार, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, यश आयुर्वेदचे डॉ. शिरीष गर्ग, डॉ. विशाखा गर्गे, डॉ. किरण पाटील, शिवम् एम.आर.आय., डॉ. सुर्यकिरण वाघण्णा, डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्या, सौ. लिना पवार, नगरसेविका यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रंसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे एस.बी. हातागडे,  सिताराम बच्छाव, गुलाबराव बोरसे, प्रल्हाद पाटील, योगीता जाधव, डॉ. श्याम टोणगांवकर आदिसह नागरीक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.