चोपडा तालुक्यात 20 किलो गांजा पकडला

0

चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

चोपडा : तालुक्यातील बुधगाव फाट्यावर एक लाख २० हजार रुपये किमतीचा २० किलो गांजा तालुक्यातील बुधगाव फाट्यावर चोपडा ग्रामीण पोलिसांनी पकडला असून, आरोपी फरार झाला आहे. याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील हातेड बुधगाव फाट्यावर बुधवारी चोपडा ग्रामीण पोलिस व डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकानेमिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मोटारसायकलवरून १ लाख २० हजार रुपयांचा गांजा घेऊन जात असताना पकडला आहे. ५० हजार रुपयांची दुचाकीही जप्त केली आहे. असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दि. २९ रोजी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधगाव फाटा येथे ही कारवाई डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने व पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, राकेश पाटील, प्रमोद बागडे, हितेश बेहरे, गणेश पाटील, रावसाहेब पाटील, विनोद पवार, सुनील कोळी, मनीष गावित, कमलेश बाविस्कर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.