गोराडखेडा येथे आगित जळुन गुरांचा मृत्यू

0

पाचोरा (प्रतिनिधी) – गोराडखेडा येथे दि २४ रोजी दुपारी २.४० वा सुमारास गुरांच्या गोठ्यास आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सविस्तर व्रुत्त असे की, गोराडखेडा बु येथील हनुमान मंदिर परिसरातील रहवासी गोपाल विठ्ठल पाटील यांच्या गोठ्यास अचानक २.४० वा सुमारास परिसरातील व्यक्तींना आग लागली असल्याचे दिसुन आले. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली असलता गुरे गोठ्यात बांधलेली असल्याचे दिसले. मात्र एवढ्या वेळात आगिने रौद्र रुप धारण केल्याने बांधलेल्या गुरांना वाचवने कठिन झाले. यात एका म्हशीचा जळुन मृत्यू झाला तर बाकी गुरांना सोडविण्यात यश आले मात्र तरीही दोन म्हशी, दोन बैल व एक वासरू काही प्रमानात भाजले. तसेच गोठ्याजवळ असलेली एम. एच. १९ बी. टी. २३१५ क्रमांकाची भाऊ साहेब अशोक पाटील यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. पाचोरा नगर पालिकाकेच्या अग्निशमन विभागाचे राजू भोसले, भिकन गायकवाड यांनी प्रयत्न करत आगिवर नियंत्रण मिळविला. जखमी गुरांवर पाचोरा पंचायत समितीचे डॉ. ए. आर. महाजन यांनी उपचार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.