गिरणा धरण फुल ; नदीत आज सकाळी सुटणार पाणी

0

गिरणा काठावरील गावातील नागरीकांनी सतर्कतेच ईशारा

जळगाव (प्रतिनिधी) : गिरणा धरण काल राञीपर्यंत १०० टक्के भरले आहे. जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेशदादा पाटील यांचे हस्ते काल राञी गिरणा धरणाच्पा पाण्याचे जलपुजन करण्यात आले. आता आज सकाळी ९ वाजता गिरणा धरणातुन गिरणा नदीला पाणी सोङण्यात येणार आहे. गिरणा धरणाने शंभरी गाठल्याने आनंदाचे वातावरण आहे. गिरणा धरण तब्बल ११ वर्षानंतर १०० टक्के भरले आहे. आता पाणीप्रश्न सुटल्याने आनंदाचे वातावरण आहे.गिरणा धरण १०० टक्के भरल्याने गिरणा नदीला आज सकाळी ९ वाजता पाणी सोङण्यात येईल . सुरुवातीस धरणातील २ मोर्यांना पाणी सोङण्यात येणार आहे . १५०० क्युसेसने गिरणा नदीत पाणी सोङण्यात येणार आहे,असे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एस आर पाटील यांनी मोबाईलवर संपर्क साधला असता सांगीतले. गिरणा काठावरील गावातील नागरीकांनी सतर्क राहावे असे यापुर्वीच प्रशासनाने जाहीर केले आहे.तरी नागरीकांनी सतर्क व जागृत राहावे असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.