भुसावळ विभागात रेल्वेतर्फे स्वच्छता पंधरवाड्‍यानिमित्त जनजागृती

0

भुसावळ (प्रतिनिधी) –  विभागात दि.१६ ते ३० सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाड्याचे शुभारंभ अप्‍पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक  सकाळी मनोज सिन्हा यांच्या हस्ते  हिरवी झेंडी देऊन स्वच्छता प्रभात रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर रॅली भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयापासून सुरू झाली आणि गांधी चौक, हंबर्डीकर चौक मार्गे भुसावळ स्थानकावर समारोप झाला.

अप्‍पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा यांच्या हस्ते स्थानकावर स्वच्छतेची शपथ देण्यात आली.या प्रतिज्ञापत्रात मूलभूत प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी,रेल्वे कर्मचारी, रेल्‍वे स्‍कुलचे विद्यार्थी, रेल्वे स्काऊट व गाईडचे विद्यार्थी, रेल्वे कर्मचारी, स्थानकाचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

भुसावळ स्थानक व व्यासपीठावर  रेल्वे शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी एक नाटक सादर केले.

अप्‍पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक व सर्व विभागीय अधिकारी व रेल्वे कर्मचार्‍यांनी रेल्वे वसाहतीत वृक्षारोपण केले.

अप्‍पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा यांनी विभागीय रेल्वे व्‍यवस्‍थापक कार्यालयात सकाळी ११ वाजता अधिकारी व रेल्वे कर्मचा-यांना स्वच्छतेची शपथ दिली.अमरावती येथे आमदार सुनील देशमुख यांनी स्थानकाला भेट देऊन वृक्षारोपणात सहभाग घेतला.तर चाळीसगाव येथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेतील विद्यार्थ्यांनी रेलीत सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.