गावठी कट्टयासह दोन आरोपी जेरबंद

0

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिरपूर धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत गावठी कट्टा व राऊंड सह दोन आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात यश आले आहे.

पंकज विनायक खैरमोडे (वय 36 रा. पोलिस मुख्यालय धुळे) नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा याच्या दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही दि. 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती.

याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेंधवा येथील दोन संशयित व्यक्ती गावठी कट्टा व राऊंड सह अवैधरित्या विक्रीकरिता हडाखेड येथील विनायक हॉटेल जवळ मोटारसायकलने येणार असल्याचे कळले.

याठिकाणी पंचासह कारवाई करण्यासाठी पोसई/ बाळासाहेब सुर्यवंशी, पोना पंकज खैरमोडे, पोना कुणाल पाटील, पोना उमेश पवार यांनी खाजगी वाहनाने हाडाखेड येथील विनायक हॉटेल जवळ साध्या गणवेशात जाऊन उभे राहून संशयित व्यक्तीकडे लक्ष देत असताना एक काळया रंगाची पल्सर मोटारसायकलवर येऊन एक व्यक्ती तिथे थांबला, संशयित व्यक्ती कोणाशीतरी फोनवर बोलत असल्याचे दिसून आले असता, पुढे पांढरा व नारंगी रंगाचा पट्टा असलेली विना नंबरची केटीएम मोटारसायकल वरील व्यक्ती संशयित व्यक्तीकडे येऊन बोलू लागल्याने संशय बळावला व काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना 12/45 वाजता घेराव घालून आपली ओळख दाखवली. दोघा संशयित व्यक्तींना त्याचे नाव गाव विचारले असता पल्सर मोटारसायकल स्वार व्यक्ती त्याचे नाव लवकुश नथिशिंग डगोर (वय 28 रा. शिव कॉलोनी नीवाली रोड सैंधवा जिल्हा बढ़वानी) असे सांगितले. व त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातील खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

1) 1600 रू किमतीचे 4 पिवळसर रंगाचे धातूचे काडतूस, ज्याची प्रत्येकी लांबी 2.5 सेमी व व्यास 7.2 मी.मी पो. स्टे.जी प्रत्येकी 400 रू किमतीचे.

2) 50,000 रू की.ची लाल काळया रंगाची विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकल चेचिस.

3) 5000 रू की. चा विवो कंपनीचा मोबाईल.

4) 500 रू की. चा सॅमसंग मोबाईल.

5) 00 रू की.चे प्लास्टिकचे ओळखपत्र त्यावर मध्यप्रदेश पोलिस व त्यांच्यावर नाव लवकुश इगोर पद – नव आरक्षक वैच नं. 689 व क्र.287 असे लिहिलेले होते.

वरील वर्णित मुद्देमाल लवकुश नथेशिंग इगोर याच्या ताब्यातून मिळून आला व केटिएम स्वार व्यक्तीचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विकास सुरजमल राठोड (वय 22 वर्ष धंदा शिक्षण रा. बनिहार तह. सैंधवा जिल्हा बड़वानी) असे सांगितले. व त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात खालील वर्णित मुद्देमाल मिळून आला.

1) 20,000 रू. की. चा. लोखंडी धातूचा गावठी कट्टा(पिस्तूल) त्याची लांबी 17 सेमी व रुंदी 11. 5 सेमी व नळीचे बॅरल 09 मिमी असलेली सेप्टि कॅप, ट्रिगर असलेली पिस्टल ग्रिपवर निळ्या रंगाचे प्लास्टिक आवरण असलेला गावठी कट्टा (पिस्तूल) त्यास लोखंडी धातूची 10.2 सेमी लांबीची म्याक्झिन.

2) 20,000 रू.की. चा लोखंडी धातूचा गावठी कट्टा (पिस्तूल) त्याची लांबी 17 सेमी व रुंदी 11.5 सेमी व नळीचे बॅरल 09 मी.मी असलेली सेप्टि कॅप ट्रिगर असलेली पिस्तूल गृपवर चॉकलेटी रंगाचे आवरण असलेला गावठी कट्टा (पिस्तूल) त्यास लोखंडी धातूची 10.2 सेमी लांबीची मॅकझिन.

3) 60,000 रू की.ची नारंगी व पांढरी रंगाची केटीएम मोटारसायकल चेचीस.

4) 5,000रू की. चा विवो कंपनीचा मोबाईल. असा एकूण 1,62,000/ रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

वरील वर्णित मुद्देमाल लवकुश डगोर व आकाश राठोड यांच्या ताब्यात मिळून आल्याने आम्हा पांचासमक्ष पोलिसांनी तुमचा पिस्तल व काडतूस वापरण्याचा परवाना आहे का असे विचारले असता, त्यांनी त्यांच्याकडे असे कोणत्याही प्रकारचे परवाना नसल्याचे कबूल केले असता, मुद्देमालासह पंचनामा करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तरी सदरील व्यक्ती चोरटी व विक्री करण्याच्या उद्देशाने स्पॉटवर मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध आर्म ॲक्ट कलम 2/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलिस अधीक्षक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, धुळे उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरपूर आर्थिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.