गावठी कट्टयाने धाक दाखविणारा एलसीबीच्या ताब्यात

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे गावठी कट्टयाचा धाक दाखवून दहशत दाखविणार्‍या तरूणाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

तालुक्यातील वरणगाव येथील प्रतिभा नगरात एक तरूण हा गावठी कट्टयाचा धाक दाखवून लोकांना घाबरवत असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी एक पथक तयार करून वरणगावच्या प्रतिभा नगरात कारवाई केली.

यश उर्फ सोनू युवराज तायडे ( वय १९) या तरूणाची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे २० हजार रूपये मूल्याचा गावठी कट्टा आढळून आला. यामुळे कट्टा जप्त करून यश तायडे याला अटक करण्यात आली आहे.

या पथकामध्ये सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ दिपक पाटील, हे.कॉ लक्षमण पाटील, पो.ना किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील आणि राजेंद्र पवार यांचा समावेश होता.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व एलसीबीचे वरिष्ठ निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.