खून प्रकरणी अवघ्या काही तासांतच आरोपीच्या आवळल्या मुसक्या..

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमळनेर येथील रात्रीचा थरार खून प्रकरणात आरोपी अवघ्या 3 ते 4 तासांत तपास करून ताब्यात घेतला आहे. चोपडा येथुन आरोपी कैलास पांडुरंग भोई याला ताब्यात घेण्यात आले आहे.

अमळनेर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळी भेट दिली असून संपूर्ण महिती घेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कौतुक केले आहे. या संपूर्ण प्रकरणात सहा पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी वेळात आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार आरोपीला चोपडा येथून सुनील हटकर व मिलिंद भामरे यांनी पकडून अमळनेर पोलीस ठाण्यात आणले आहे व आज चौकशी अंती उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सदर आरोपी फरार झाला होता. पैशांच्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. भल्या पहाटे ही घटना घडल्या नंतर कैलास फरार झाला होता. अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक उपस्थित होते. खून ज्या हत्याराने झाला ते घटनास्थळी मिळून आले नसून या संदर्भात सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.