कोपरी ग्रामस्थ क्रीडा संकुलातील खुल्या रंगमंचाचे उदघाटन

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

कार्यसम्राट नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने महापौर नरेश म्हस्के यांच्या महापौर निधीतुन कोपरी गाव येथील कोपरी ग्रामस्थ क्रीडा संकुलातील खुल्या रंगमंचाचे आज महापौर नरेश म्हस्के व आमदार रविंद फाटक यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रमाकांत पाटील, स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नगरसेविका शर्मिला गायकवाड, नगरसेविका नम्रता पमनानी, विभागप्रमुख गिरीश राजे, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, शाखाप्रमुख प्रशांत पाटील, कोपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे हभप सखाराम महाराज इंदोरे, परिवहन सदस्य नितीन पाटील, कृष्णकांत कोळी, गावदेवी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष संजय पाटील, जेष्ठ समाजसेवक भालचंद्र पाटील, विठ्ठल रखुमाई मंदिराचे अध्यक्ष गणेश भोईर, मधुकर पाटील,कुणाल पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे देखील उद्घाटन करण्यात आले. सदर काम केल्याबद्दल महापौर नरेश म्हस्के, नगरसेविका मालती, रमाकांत पाटील याचेही आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.