खामगाव रत्न पुरस्काराने अशोक सोनोने तर स्व.बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्काराने शरद देशमुख सन्मानित

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

खामगाव प्रेस क्‍लब, खामगावच्या वतीने 6 जानेवारी पत्रकार दिनी स्थानिक पत्रकार भवन येेेथे आयोजित कार्यक्रमात मागील 15 वर्षापासून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा खामगाव रत्न पुरस्कार यंदा अशोक सोनोने यांना तर स्व. बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार शरद देशमुख यांना तसेच खामगाव शहरातील सेवाभावी क्षेत्रात उल्‍लेखनीय कामगिरी करणार्‍या संस्थेला देण्यात येणारा खामगाव गौरव पुरस्कार यावर्षी तरुणाई फाऊंडेशन संस्थेला देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामगाव प्रेस क्‍लब खामगावचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले होते. तर प्रमुख उपस्थिती खामगाव विधानसभाचे आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जेष्ठ पत्रकार राजेश राजोरे, तहसिलदार अतुल पाटोळे, खामगाव प्रेस क्‍लबचे सचिव अनिल खोडके आदींची उपस्थिती होती. सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते बाळशास्त्री जांभेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पहिल्या महिला पत्रकार तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन सरस्वती पुजन करण्यात आलेे.

याप्रसंगी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांनी पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी दिल्या जाणार्‍या पुरस्काराचे महत्व विशद केले. यानंतर खामगाव रत्न पुरस्कार प्राप्‍त अशोक सोनोने यांच्या जीवन परिचय जेष्ठ पत्रकार गजानन कुळकर्णी यांनी तर स्व. बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारीता पुरस्कार पऋाप्‍त शरद देशमुख यांचा परिचय अशोक जसवानी यांनी तसेच खामगाव गौरव पुरस्कार प्राप्‍त तरुणाई फाऊंडेशन या संस्थेचा संक्षिप्‍त आढावा अनिल गवई यांनी घेतला.

या सोहळयात समाजातील शोषित उपेक्षितांना न्याय देण्यासाठी लढणारे छोटयाश्या गावात राजकारणात सुरुवात करुन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहचलेले खामगाव शहराचे नाव लौकिकात भर घालून खामगावकरांची मान उंचविणारे अशोक सोनोने यांना खामगाव रत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. तर बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार शरद देशमुख यांना देेवून गौरविण्यात आले.

खामगाव शहरासह ग्रामीण परिसरात सेवा कार्य करुन ग्रामीण भाग व शहरी भाग यांच्यात समन्वय साधून कार्य करत असलेले तरुणाई फाऊंडेशन या संस्थेला खामगाव गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कार प्राप्‍त मान्यवरांना खामगाव प्रेस क्‍लब पदाधिकारी व पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा देवून पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमोचे संचालन संभजीराव टाले तर आभार अनिल खोडके यांनी मानले. यावेळी खामगाव शहरातील मान्यवरांसह सर्व खामगाव प्रेस क्‍लबचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.