ऑडी कारची विजेच्या खांबाला जोरदार धडक; आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्नाटकमध्ये भीषण अपघात झाला आहे. ऑडी कारची विजेच्या खांबाला जोरदार धडक बसली आहे. या अपघातात आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बंगळुरू शहरातील कोरोमंगलामध्ये ही मोठा दुर्घटना घडली. साधारण रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. ऑडी अत्यंत वेगात असून त्यामुळेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती विजेच्या खांबावर आदळली. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

बंगळुरू अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सात लोकांमध्ये तामिळनाडूमधील होसूरच्या डीएमके आमदाराचा मुलगा आणि सूनेचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. करुणा सागर आणि बिंदू यांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये ऑडी कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. करुणा सागर, बिंदू (वय 28), इशिता (वय 21), डॉ. धनासु (वय 21), अजय गोयल, उत्सव आणि रोहित (वय 23) अशी मृतांची नावं आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.