ऐनपूर महाविद्यालयात मैत्री कार्यशाळेत तरूणाईला बहार

0

निंभोरा बु दि. 3 –
येथून जवळच ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.01 ते 03 जानेवारी 2019 या कालावधीत तीन दिवशीय मैत्री कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसर्‍या दिवशी कार्यशाळेत मैत्री भावना विकास ध्यान या विषयावर प्रा.व्ही.एन.रामटेक, मैत्री समाजाशी याविषयावर प्रा.डॉ.साहेब पडलवार, समाज माध्यमे आणि मैत्री या विषयावर प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी अनमोल असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वांच्या व्याख्यानातून मैत्री व प्रमे यांचा सुरेख उलगडा केला. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात तरूणाईला बहार येऊन विविध गृप नुसार एकाच गितावर विविध कलेने नृत्य सादर करून नंतर विविध नाटके व डान्स सादर केले. उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या गृपचा कबचौउमवी व्यवस्थापण परीषद सदस्य प्रा.एन.यू.बारी यांनी सत्कार करूण प्रोत्साहित केले. विविध वक्त्यांचे व्याख्याने, मनोरंजनात्मक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध विषयांवर गट चर्चेचे आयोजनाने तरूणाई
मध्ये उत्साह निर्माण झाला. सुत्रसंचालन प्रा.एस.पी.उमरीवाड, प्रा.डाँ. डी.बी.पाटील, प्रा.दिलीप सोनवणे यांनी केले तर आभार प्रा.व्ही.एच.पाटील, प्रा.डाँ.जे.पी.नेहेते, यांनी केले. यावेळी कबचौ उमवी व्यावस्थापण परीषद सदस्य प्रा.एन.यू.बारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.जे.बी.अंजने, सिनेट सदस्य डॉ. के.जी.कोल्हे सोबत कार्यशाळेचा आनंद घेत प्रा.डाँ. रेखा पाटील, उपप्राचार्या प्रा.डाँ.निता वाणी, प्रा.के.एल.हेरोळे, प्रा.एस.बी.महाजन, प्रा.एच.एम.बाविस्कर, प्रा.एस.एन.वैष्णव, उपप्राचार्य डॉ.पी.आर.महाजन, प्रा.डाँ. आर.व्ही.भोळे, प्रा.डॉ.एस.ए.पाटील, प्रा.डाँ. एस.बी.महाजन, प्रा.डाँ.एस.आर.इंगळे, प्रा.डॉ.पी.आर.गवळी, प्रा.एम.के.सोनवणे, कार्यालयीन अधिक्षक गोपाल महाजन, श्रीराम चौधरी, प्रविण महाजन, पुंडलिक पाटील, गोपाल पाटील, महेंद्र महाजन, गणेश महाजन, नितीन महाजन, भास्कर पाटील, कुतृ अवसरमल, हर्षल पाटील आदि प्राध्यापक व प्राध्यापेकेतर कर्मचारी हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.