सार्वे येथील कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

0

पारोळा,दि.3-
तालुक्यातील सार्वे येथील 55 वर्षे शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 2 रोजी रात्री नऊ वाजता घडली.
याबाबत एकनाथ पांडुरंग मकासरे (55) यांनी दिनांक 2 रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे पत्र्याचे राहते घरात लोखंडी एंगल ला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्याकडे दोन हेक्टर शेती असून त्यांच्यावर विकास सोसायटीचे कर्ज होते व सततची नापिकी मुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
याबाबत पारोळा पोस्टेला जितू एकनाथ मकासरे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रकाश चौधरी हे करीत आहेत. मयत मकासरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.