सदाशिव नगरात घरफोडी, पाच लाखांचा ऐवज लंपास

0

जळगांव.दि.3-
शहर परिसरातील सदाशिव नगर भागात बंद घराची टेहळणी करून घरमालक घरी नसल्याची संधी साधुन चोरटयांपी रोख रकमेसह पाच लाखांच्या वर ऐवज लपास केला. हि घटना गुरूवार सकाळी 9 ते 10 वाजेच्या सूमारास नागरीकांच्या लक्षात आली. सप्तश्रृंग गडावर वणी, नाशिक येथे देवीच्या दर्शनासाठी दादाराव देविदास सोनवणे हे परीवारासह गेले होते,
त्यांच्या पश्चात बंद घराचे कुलुप तोडून साडे चार लाख रुपये रोख व 52 हजार 300 रुपये किमतीचे दागिने असा पाच लाखांवर ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना गुरुवारी सकाळी शहरातील सदाशिव नगरापरीसरात उघडकीस आली.
दादाराव सोनवणे हे मुळचे रावेर येथील रहिवाशी असून खते विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. सदाशिव नगरात परीवारासह राहतात. सोनवणे यांचे कुटुंब बुधवारी सकाळी सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी वणी नाशिक येथे गेले होते. बंद घराची टेहळणी करून चोरट्यांनी संधी साधून दागिने व रोख रक्कम लांबविली. गुरुवारी सकाळी घराचा दरवाजा उघडा असल्याने शेजार्‍यांच्या लक्षात आले. चोरी झाल्याचा शेजार्‍याना संशय आल्यावरून सोनवणे यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.