उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू धंद्यांवर कारवाई

0

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे आणि अधीक्षक भाग्यश्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये एकुण ११६ गुन्हे नोंदविण्यात आले. याच कालावधीत ९९ वारस गुन्हे, १७ बेवारस गुन्हे नोंदवुन ९९ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच ८५६ लिटर हातभटटी, १६०९४ लिटर सडवा, ३५५ लिटर देशी दारु, ४७ लिटर विदेशी दारू तसेच १० वाहनांसह एकुण २१ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची दिवार्षिक निवडणुक २०२१ च्या पार्श्वभुमीवर दिनांक ८ ते १० डिसेंबर  रोजी जाहीर केलेल्या कोरड्या दिवसाच्या अनुषंगाने दुय्यम निरीक्षक आर.के. फुसे, एन.के. मावळे यांच्या पथकाने रात्री गस्त घालुन एमआयडीसी ते पारखेड रोडवर, पारखेड शिवारात सापळा रचुन एक बजाज कंपनीचा ऑटो रिक्षामध्ये अवैधरीत्या देशी दारुची वाहतुक करतांना एकुण १९ बॉक्स (१९०० देशी दारुच्या सीलबंद बाटल्या) असा एकुण १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केलेला आहे.

आरोपी संतोष जनार्धन सोनोने रा. पारखेड यांचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ क, ड नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर कार्यवाहीत दुय्यम निरीक्षक आर.के. फुसे, एन.के. मावळे तसेच जवान प्रदीप देशमुख, अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, शारदा घोगरे सहभागी होते.

तसेच आपल्या परिसरात अशी अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास या विभागास या विभागाचे टोल फी नंबर १८०० ८३३३३३ वर किंवा व्हॉटअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा http://excises uvidha.mahaonline.gov.in  या विभागाचे पोर्टलवर माहिती कळवावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालवितांना वाहनांचा परवाना आवश्यक आहे.

त्याप्रमाणे मद्य बाळगतांना, मद्य सेवण, मद्य वाहतुक करतांना या विभागाचा मद्यसेवन परवाना असणे आवश्यक आहे. तसेच अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करतांना अथवा मद्यविक्री करतांना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.