गायरान बचाव मंचचा मुकमोर्चा यशस्वी

0

  धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील गट नं.1248, 1248-1, 1248-2 (दत्त टेकडी परिसर) या शासकीय गायरान जागेवरील अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी गेल्या तीन महिन्यापासून दिलेले असतांना सुद्धा व अनेक प्रयत्न करून देखील स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई अद्याप पावतो केलेली नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी याविषयास समर्थन म्हणून 22 हजार नागरिकांनी सह्या दिलेल्या आहेत.

स्थानिक प्रशासनाने बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी यासाठी गायरान बचाव मंचने मुकमोर्चाचे आयोजन केलेले होते. मुकमोर्चाची सुरुवात बालाजी महाराज मंदिर याठिकाणाहुन गोमतेचे पूजन करून करण्यात आली. मुकमोर्चात अग्रस्थानी संत मंहत प.पू. महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज,(राष्ट्रीय कोषाध्यक्ष-अखिल भारतीय संत समिती,अयोध्या), श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर ह.भ.प. भगवानदासजी महाराज (अध्यक्ष-वारकरी शिक्षण मंडळ,धरणगाव), प.पू. स्वामी नारायणाचार्य (मंहत-श्री क्षेत्र रामेश्वरम) घोडागाडीवर विराजमान होते.

त्यांनतर वारकरी मंडळ, महिला, पुरुष नागरिक हजारोंच्या संख्येने मुकमोर्चात सहभागी झाले. महाकाय मुकमोर्चाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सभेत रूपांतर झाले.  त्याठिकाणी व्यासपीठावर प.पू. महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज, श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर ह.भ.प.भगवानदासजी महाराज, प.पू. स्वामी नारायणाचार्य, अमोल महाजन (संयोजक) शिरीष बयास, अँड. राहुल पारेख,अँड. रामभाऊ शिंदे, भास्कर मराठे, डिंगबर चौधरी, हेमंत महाजन उपस्थित होते.

प्रास्ताविकेतून घटनाक्रम अँड.राहुल पारेख यांनी सांगितला. संयोजक अमोल महाजन यांनी मनोगनातून गायरान बचाव मंचची पुढील दिशा मांडली. महामंडलेश्वर भगवान महाराज यांनी गाईचे महत्व पटवून देत शेतकरी व गुरांना न्याय देण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन गायरान वाचवू असे सांगितले. प.पू. स्वामी नारायणाचार्य यांनी गोमतेच्या गायरणांसाठी आपाल्याला मोर्चा काढावा लागत आहे, म्हणून दुःख व्यक्त करत म्हणाले या देशात एकही व्यक्ती नाही ज्यांने गाईचे दूध पिले नसेल असे संबोधले. प.पू. महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, प्रशासनाने जर या मुकमोर्चाची दखल घेतली नाही तर देशातील 127 संप्रदायाचे प्रमुख महंतासह आपण भव्यदिव्य मोर्चा काढुन पुन्हा गायरान वाचविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

मुकमोर्चासाठी व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक रतन वाघ यांनी तर आभार घनश्याम पाटील यांनी मानले.

विशेष उपस्थिती

संसद सुरू असताना देखील गायरणाचा विषय गांभीर्याने घेत जळगाव लोकसभेचे खासदार खा. उन्मेषदादा पाटील हे मोर्चात सहभागी होण्यासाठी दिल्लीहून आले. त्याचबरोबर शहरातील डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, वकील संघटना, हमाल मापाडी संघ, चालक मालक संघ, वारकरी संप्रदाय, माऊली संप्रदाय, शेतकरी बांधव यांच्यासह शहरातील माता भगिनी, समाज बांधव, हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.