बेकायदेशीररित्या गोमांसची वाहतूक; ३ जण अटकेत

0

फैजपूर ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

बेकायदेशीररित्या गोमांस घेवून जाणाऱ्या रिक्षावर फैजपूर ते यावल रोड येथे पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून वाहन जप्त करण्यात आले आहे. तिघांवर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मंगळवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्य सुमारास फैजपूर ते यावल रस्त्यावरील साखर कारखान्याजवळ गस्तीवर असतांना रिक्षा क्रमांक (एमएच १९ एस ८१०३) मध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्यात. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक महेंद्र महाजन यांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

यावेळी रिक्षाची पाहणी केली असता संशयित आरोपी शेख काफिल शेख गंभीर (वय ३४, रा. हजिरा मोहल्ला फैजपूर ता. यावल), अनिस खान अजीज खान रा. फैजपूर आणि रईस (पुर्ण नाव माहित नाही) रा. यावल हे तिघे बेकायदेशीरित्या गोमांसची विक्री करण्याच्या उद्देशाने ३० किलो गोमांस आढळून आले.

तिघांना तब्यात घेतले असून रिक्षा जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक यांच्या फिर्यादीवरून दुपारी फैजपूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देविदास सुरदास करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.