इम्पेरिकल डेटाची व्याख्या माहीत आहे का?: पंकजा मुंडेंचा सवाल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मुंबईत भाजप मुख्यालयात आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुमच्या महाराष्ट्रात काय चाललयं असं, लोक मला विचारतात, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

सत्तेत असणारे लोक अनुभवी आहेत. ओबीसींना अंधकारात लोटणारा निर्णय म्हणजे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, असे त्या म्हणाल्या. इम्पेरिकल डेटाची मागणी न्यायालयाकडून सातत्याने होत आहे. मात्र सरकारकडून दिले जात नाही. या सरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचे का?आरक्षण संरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचे ढोंग सरकारने केले आहे.

या अध्यादेशाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रत्येक बलाढ्य नेत्यांच्या चुकीच्या कामांसाठी निधी आहे. पण मागासवर्गीय आयोगाला निधी उपलब्ध करुन दिलेला नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. प्रत्येक गोष्ट, निर्णय यासाठी केंद्राकडे बोट दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. आपल्याला इम्पेरिकल डेटाची व्याख्या माहीत आहे का?, असा सवाल पंकजा यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.