डाॅ. जगदीश पाटलांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी (ओबीसी सेल) निवड

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई येथे टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलचा मेळावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अध्यक्षतेखाली २२ रोजी संपन्न झाला.

मेळाव्यात काॅग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदिश पाटील यांची प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल पदी नियुक्ती करण्यात आली. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचे हस्ते डॉ. पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

प्रसंगी ओबीसी जळगाव जिल्हाध्यक्ष डी. डी. पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष सखाराम मोरे, जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, मुक्ताईनगर काँग्रेस शहराध्यक्ष पवन खुरपडे, अ.जा. तालुकाध्यक्ष निलेश भालेराव, कार्याध्यक्ष राजू जाधव, रवी जयकर व आदी ओबीसी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.