महात्मा फुले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न …

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शाळेतील आठवणींना उजाळा देत महात्मा फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. शाळेची स्थापना झाल्यापासून  २०२१  पर्यंत स्नेहमेळावा झालेला नव्हता. १९९२-१९९३ च्या वर्षांतील शाळेचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते.

मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.

शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर बी. ए. पाटील, माझी शिक्षक जे. ए. पाटील, आर. बी. पाटील, जे. टी. महाजन, आर. डी. महाजन, अनिल माळी, एम. के. महाजन यांच्यासह अनेक मान्यवर माजी विद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी उच्चपदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी डॉ. देवकीनंदन वाघ, प्रा. प्रशांत पाटील, अभिजित पाटील, विजय महाजन, सुरज पाटील, एकनाथ महाजन, पंकज महाजन, प्रशांत निकम, सुधाकर महाजन, मनीषा माळी, मंगला महाजन, सुशीला महाजन, नाना मराठे, अजय महाजन, दिलीप पाटील, भिकन चौधरी, कैलास धुरेकर, देविदास पाटील यांचासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांचा छत्रपती शिवरायांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.

या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा व ओळख परेड तसेच स्नेहभोजन व शाळेविषयी जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी या मेळाव्यानिमित्ताने आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी शिक्षक जे. ए. पाटील म्हणाले, आजच्या युगात तरुण पिढी बिघडली असे म्हटले जाते पण आमच्या महात्मा फुले हायस्कूलचे  सन ९२ -९३  च्या सालातील आमचे विद्यार्थी बिघडलेले नाहीत तर चांगल्या संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे . यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा देत. विद्यार्थाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

माजी विद्यार्थी  विजय महाजन म्हणाले की, ‘या मेळाव्याच्या अयोजनामुळे एक नवीन दिशा मिळणार आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करून त्या मार्फत मदत करावी.’

माजी विद्यार्थी अभिजित पाटील म्हणाले की, ‘माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून धरणगाव तालुक्याच्या शिक्षण क्षेत्राला चांगली दिशा देण्याचे काम करता येईल. मेळाव्याचे आयोजन करण्यामागील हेतु स्पष्ट केला.

यावेळी प्रस्ताविक स्वाती पाटील यांनी केले. सुत्रसंचालन एलसीबी पोलीस कॉन्स्टेबल सुरज पाटील यांनी तर अभार प्रशांत निकम  यांनी मानले. माजी विद्यार्थी मेळाव्याला ७० हुन अधिक विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादात आणि  शिक्षकवृंदाच्या उपस्थितीत जोरदार संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.