आवश्यक कामे करून घ्या; डिसेंबर महिन्यात बँकांना 14 दिवस सुट्ट्या, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

0

मुंबई:  बँकांमधील जर काही महत्त्वाची कामे असतील तर ती आधीच पूर्ण करून घ्या. कारण कारण पुढच्या महिन्यात भरपूर दिवस बँका बंद राहणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांना जरी आराम मिळणार असला तरी सामान्य माणसांच्या कामाचा यामुळे खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्टी तर नाही ना याची एकदा खात्री करुन मगच जा ! अर्थात प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या आहेत. डिसेंबर महिन्यात बँका 14 दिवस बंद राहतील.

3 डिसेंबरला बँक बंद राहील

डिसेंबर महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची सुरुवात 3 तारखेपासून होईल. 3 डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर आहे, ज्यामुळे बँका बंद राहतील. यानंतर 6 तारखेला रविवारी असल्याने बँकांना देशभरात साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर 12 तारखेला डिसेंबर महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर, रविवारी 13 तारखेला साप्ताहिक सुट्टी असेल.

या दिवसही सुट्टी असेल

गोव्यामध्ये 17 डिसेंबरला लॉसोन्ग पर्व, 18 डिसेंबरलाडेथ अ‍ॅनिव्हर्सरी यू सो थम आणि 19 डिसेंबरला गोवा मुक्ति दिनची सुट्टी असेल. यानंतर, 20 तारखेला रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

ख्रिसमसची सुट्टी दोन दिवस असेल

डिसेंबरमध्ये ख्रिसमसलाही दोन दिवस सुट्टी असेल. 24 आणि 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असेल. तसेच 26 डिसेंबरला महिन्याचा चौथा शनिवारी असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी असेल आणि 27 डिसेंबर रोजी रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल. याचबरोबर, 30 डिसेंबरला यू कीअंग नंगबाह आणि 31 डिसेंबरला इयर्स ईव असल्यामुळे काही राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.