२४ तासांमध्ये देशभरात ४५ हजार ३३३ रुग्ण कोरोनामुक्त

0

नवी दिल्ली : मागील २४ तासांमध्ये देशभरात ३८ हजार ७७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आले आहे. तर ४४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९४ लाख ३१ हजार ६९२ वर पोहचली आहे.

 

सध्या देशात ४ लाख, ४६ हजार ९५२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ३७ हजार १३९ रुग्ण दगावले आहेत. याशिवाय कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ४५ हजार ३३३ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे आतापर्यंत देशातील करोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळालेल्याची एकूण संख्या ८८ लाख ४७ हजार ६०० वर पोहचली आहे.

 

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आतापर्यंत १४,३,७९,९७६ नमुन्यांच्या तपासण्या झाल्या आहेत. यातील ८ लाख ७६ हजार १७३ नमुने काल(रविवार) तपासले गेले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.