रेडमीचा ‘या’ फोनच्या किमतीत वाढ, जाणून घ्या नवीन किंमत

0

नवी दिल्ली : शाओमीची सब ब्रँड स्मार्टफोन मेकर कंपनी रेडमीने आपल्या Redmi 9A या स्मार्टफोनच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ केली आहे. या फोनच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे ती २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये. ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत वाढवली नाही.

रेडमी ९ ए ची किंमत

रेडमी ९ ए च्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २०० रुपये वाढवण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन आता ६ हजार ७९९ रुपयांऐवजी ६ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहे. तर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा फोन आधीच्या किंमतीत ७ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकणार आहे. रेडमीच्या या बजेट फोनची नवी किंमत mi.com वर लिस्ट करण्यात आली आहे. या फोनमध्ये डिव्हाईस नेचर ग्रीन, सी ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक कलरमध्ये येते.

फोनची वैशिष्ट्ये

शाओमीच्या रेडमी ९ ए मध्ये ६ ३३ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी पॅनल आहे. स्क्रीनचे आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि रेजॉलूशन 720 x 1600 पिक्सल आहे. स्क्रीनवर एक वॉटरड्रॉप नॉच आहे. ज्यावर फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये २ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी २५ प्रोसेसर दिला आहे. इनबिल्ट स्टोरेज ३२ जीबी दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. हँडसेट पॉलीकार्बोनेट रियर सोबत येते. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सोबत येते. फोनवर देण्यात आलेल्या वॉटरड्रॉप नॉच मध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.